इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ॲपल कंपनी नवनवीन अत्याधुनिक मॉडेलचे संगणक आणि लॅपटॉप लॉन्च करत असते, सहाजिकच उच्चशिक्षित विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसाय करणारे तरुण यांना या नवीन मॉडेलच चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे. विशेष म्हणजे नवीन लॅपटॉप मध्ये विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांपर्यंत सवलत देखील मिळणार आहे
अॅपल कंपनीने वार्षिक परिषदेत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अॅपलने फक्त नवीन M2 चिपसेटसह 13 इंचाचे MacBook Air आणि MacBook Pro लॅपटॉप देखील लॉन्च केले आहेत. मॅकबुक एअरला नवीन डिझाइन मिळाले आहे, तर मॅकबुक प्रोची रचना तशीच ठेवण्यात आली आहे.
MacBook Air M2
नवीन लॅपटॉपचा डिस्प्ले आता मॅकबुक प्रो 14-इंच सारख्या सोयीसह देण्यात येतो. या कंपनीने आता FaceTime चा कॅमेरा 720p ऐवजी 1080p वर अपग्रेड केला आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये 2 थंडरबोल्ट किंवा 4 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यावेळी लॅपटॉपमध्ये ट्रू टोन तंत्रज्ञानासह 13.6 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले वापरण्यात आला आहे.
फास्ट चार्जिंग
MacBook Air M2 11.3mm पातळ आहे आणि चार रंग पर्यायांमध्ये येतो – सिल्व्हर, स्टारलाईट, स्पेस ग्रे आणि मिडनाईट. लॅपटॉपचे वजन 2.7 lb (1.2 kg) आहे. तसेच 5000mAh बॅटरीसह टेक्नोचा मस्त फोन, कमी किंमतीत मिळणार चांगले फीचर्स यात मिळणार आहे. दुसरा मोठा बदल मॅगसेफशी संबंधित आहे. कंपनीने मॅकबुक एअरमध्ये मॅगसेफ चार्जिंग तंत्रज्ञान परत आणले आहे. यावेळी लॅपटॉपमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. कंपनी लॅपटॉपसोबत बॉक्समध्ये 30W फास्ट चार्जर देईल. परंतु Apple ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करणारे भारतीय ग्राहक 35W किंवा 67W फास्ट चार्जरमध्ये अपग्रेड करू शकतात. M2 चिपमुळे, तुम्हाला नवीन लॅपटॉपमध्ये चांगली कामगिरी आणि सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव मिळेल.
किंमत
MacBook Air M2 अधिकृत Apple ऑनलाइन स्टोअर भारतावर 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचीबद्ध केले गेले आहे. ही बेस व्हेरिएंटची (256GB) किंमत आहे. लॅपटॉप वापरकर्ते अधिक स्टोरेज प्रकार देखील निवडू शकतात, ज्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. फास्ट चार्जरलाही जादा पैसे मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, MacBook Pro M2 चे बेस मॉडेल (256GB स्टोरेज) 1,29,900 रुपयांपासून विक्री होईल. विशेष म्हणजे शिक्षणासाठी म्हणजेच कंपनी विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची सूट देणार आहे.