इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात मार्केट शेजारी असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागून १० ट्रक, टेम्पो जळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊनमध्ये ही आग पसरली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अश्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेनंतर पोलिसही या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरु करण्यात आला. आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला राज्यातील विविध भागांतून येत असतो. या ट्रक नेमक्या कोणत्या होत्या. हे मात्र समोर आलेले नाही.