गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अपेडाचे अल्कोहोलिक पेय निर्यातीला प्रोत्साहन…१ अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट

by India Darpan
सप्टेंबर 4, 2024 | 7:11 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 10

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -भारतीय मद्य उत्पादनांना जगात वाढती मागणी असून, यामधून या क्षेत्रात विकासाची संधी असल्याचे स्पष्ट होत आहे. अपेडा (APEDA), अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने पुढील काही वर्षांमध्ये १ अब्ज डॉलर्स निर्यात महसुलाचे उद्दिष्ट ठेवून, जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक (मद्य) आणि नॉन-अल्कोहोलिक (मद्य विरहित) पेयांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून अपेडा ने परदेशातील प्रमुख देशांमध्ये भारतीय मद्य उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मद्य (अल्कोहोलिक) निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.

भारतात राजस्थानमध्ये बनवण्यात आलेली गोदावन सिंगल माल्ट व्हिस्की, युनायटेड किंगडममध्ये आर्टिझन सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून, प्रवेश करण्यासाठी सज्ज असून, भारतीय मद्य निर्यातीमधील हा महत्वाचा टप्पा ठरेल.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि डायजिओ पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेब्रा क्रू, अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, डियाजिओ इंडिया च्या एमडी आणि सीईओ हिना नागराजन, आणि इतर वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत, गोदावनच्या पहिल्या तुकडीला युनायटेड किंग्डममधील निर्यातीसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीने मार्च २०२४ मध्ये लंडनमधील इंटरनॅशनल फूड अँड ड्रिंक्स इव्हेंट (IFE) मध्ये अपेडा अंतर्गत सहभाग नोंदवला होता, आणि गोदावनची जाहिरात केली होती. गोदावनचा यूकेमधील प्रवेश आणि यूकेला निर्यात होण्यामध्ये या सहभागाने मोलाची भूमिका बजावली. अलवर भागातील शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. गोदावनच्या उत्पादनासाठी वापरलेली ‘सिक्स-रो’ प्रकारची बार्ली, स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली असून, उद्योगांना पुरवठा साखळीशी जोडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोर्टाच्या आदेशाने जप्त केलेली सदनिका कर्जदार दांम्पत्याने बेकायदा बळकावली…गुन्हा दाखल

Next Post

अंजली दमानियांचा प्रश्न…अजित पवार, वडेट्टीवार १० वी पास, संतोष बांगर ४ थी पास, मग लिपीक भरतीत पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असण्याची अट का?

India Darpan

Next Post
anjali damaniya

अंजली दमानियांचा प्रश्न…अजित पवार, वडेट्टीवार १० वी पास, संतोष बांगर ४ थी पास, मग लिपीक भरतीत पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असण्याची अट का?

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011