मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई महानगर पालिकेत क्लर्कच्या भरती साठी इतक्या भरमसाठ अटी कशासाठी? असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले. यावेळी त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट टाकत थेट नेत्यांचे शिक्षण काढले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुमच्या मुलांना मिळतात तशा सुखसोयी सगळ्या मुला / मुलींना मिळत नसतात. झगडावं लागतं त्यांना शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, नोकरीसाठी. १० वी व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात का हवी ? मी खाली काही उदाहरण दिली आहेत ती पाहा, अशी कित्येक उदाहरणे देऊ शकते जिथे शाळेत नापास झालेले, IAS झाले आहेत…..हे तर क्लर्क म्हणून भरती होणार आहेत.
इंग्रजी व मराठी टाइपिंग आले पाहिजे? BMC मधे टाइपरायटर आहेत तरी का? आता सगळ्यांना कंप्यूटर टाइपिंग करावे लागते ना.
प्रकल्पग्रस्त हा प्रकल्पग्रस्त असतो, मुंबई – ठाण्यातील वेगळा नसतो. त्यांना समान संधी देणे अपेक्षित आहे. एक तर ही ९ तारीख पुढे ढकला आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून या तीन अटी रद्द करा.
भूषण गगरानी आणि अश्विनी जोशी ह्यांनी कृपया दाखल घ्यावी
अजित पवार १० पास
विजय वडेट्टीवार १० पास
गिरीश महाजन SYBCom
शंभूराज देसाई SYBCom
भारत गोगवले ८ पास
संदीपान भुमरे १० पास
धरामरावबाबा अत्राम १० पास
गुलाबराव पाटील १२ पास
संतोष बांगर ४ पास
हे सगळे महाराष्ट्र चालवायला चालतात, पण लिपिक भरती मध्ये १० व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट ?