इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सध्याची हॉट जोडी म्हणजे वीरूष्का. अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. हे दोघेही तसे सोशल सर्कलमध्ये रमणारे आहेत. सोशल मीडियावरही ते नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा असते. सध्या एका कारणावरून अनुष्का चर्चेत आली आहे. एका कंपनीने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर विनापरवानगी अनुष्काचा फोटो पोस्ट केल्याने अनुष्का भलतीच चिडली. तिने हा फोटो तात्काळ काढून टाकायला सांगितलं.
‘पुमा’ या ब्रॅण्डने ही आगळीक केली आहे. अनुष्काने या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, विराट याच कंपनीचा ब्रँड अँबेसेडर आहे. या प्रकरणी विराटने बायको अनुष्काची साथ देत ‘पुमा इंडिया’कडे ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली आहे.
अनुष्काच्या परवानगीशिवाय पुमा इंडियाने त्यांच्या सिझन सेलसाठी तिच्या फोटोचा वापर केल्याचा अनुष्काचा आक्षेप आहे. याच गोष्टीमुळे सध्या अनुष्का नाराज आहे. पुमा इंडियाला टॅग करत अनुष्का म्हणते, ‘माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कोणत्याही ब्रँडसाठी माझा फोटो वापरू शकत नाही. मी तुमच्या कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर नाही, त्यामुळे हा फोटो काढून टाकावा.’ अनुष्काच्या या तक्रारीची ‘पुमा’ने तात्काळ दखल घेतली आहे. ‘आम्ही तुझ्याशी आधीच संपर्क साधायला हवा होता. आता आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करूया का. जे चुकून घडले ते जाणीवपूर्वक प्रत्यक्षात उतरवूया का, अशी पोस्ट पुमा कंपनीने लिहिली आहे. याहीपुढे जात पुमा आणि अनुष्काच्या कराराचा एडीट केलेला फोटोसुद्धा त्यांनी गंमत म्हणून पोस्ट केला आहे.
विराट कोहलीने देखील बायकोच्या तक्रारीची दखल घेतली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनुष्काच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट शेअर करत पुमा इंडियाने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, असे म्हटले आहे. विराट कोहली हा २०१७ पासूनच पुमा इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. या कंपनीने विराटला २०१७ मध्ये ८ वर्षांसाठी ११० कोटी रुपयांना साइन केलं. २०२५ मध्ये हा करार संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, पुम इंडिया कंपनीच्या उत्तरामुळे ही सर्व मार्केर्टिंग स्ट्रॅटेजी असू शकतं, अशी चर्चा होते आहे. कंपनीच्या नावाची चर्चा घडवून आणण्यासाठी अशा पद्धतीचे वाद घडवून आणले जातात, अशी टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे.
Anushka Sharma Angry Virat Kohli Reason