इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध कडक धोरणावर काम करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर दक्षता व लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालया कडून सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत. छापेमारीचे ताजे प्रकरण समोर आले आहे. प्रत्यक्षात कचार जिल्ह्यातील लखीपूर वनविभागाच्या रेंजरला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. छाप्याची माहिती मिळताच रेंजर पळून गेला, त्यानंतर पथकाने धाव घेऊन त्याला पकडले.
आसामच्या सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी सतर्कता आणि भ्रष्ट्राचार विरोधी संचालनालयाकडून अभियान सुरू आहे. टीमने कछार जिल्ह्याच्या लखीपूर वन मंडलच्या रेंजरला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. छापेमारीची माहिती मिळताच रेंजर आपल्या ऑफिसातून पैसे घेऊन पळू लागला. मात्र टीमच्या काही जणांनी रेंजरला पकडलं आणि तातडीने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसाम कछार जिल्ह्यातील लखीपूर वन मंडलमधील रेंजर देवव्रत गोगोई यांच्यावर जंगलातील संसाधनांच्या तस्करीच्या बदल्यात एका व्यापाऱ्याकडून कथितस्वरुपात लाच घेण्याचा आरोप केला जात होता. हे प्रकरण आसाममधील कचार जिल्ह्यातील लखीपूर वनविभागातील आहे. येथे तैनात असलेले रेंजर देबब्रत गोगोई दीर्घकाळापासून लाच घेतल्याच्या आरोपांना सामोरे जात होते.
https://twitter.com/gpsinghips/status/1554750037334233088?s=20&t=KO5pY5tVwQObdqcaX62yTQ
वनसंपदेची तस्करी करण्याच्या बदल्यात गोगोई एका व्यावसायिका कडून लाच घेतात, असा आरोप होता. त्यामुळे गुप्तचराच्या माहितीवरून दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या पथकाने गोगोई यांच्या कार्यालयावर छापा टाकला.आसामचे विशेष पोलिस महासंचालक जीपी सिंह यांनी या मोहिमेबाबत ट्विट केले आहे.
सध्या रेंजर गोगोई यांची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर गोगोई यांच्या गुवाहाटी आणि जोरहाट येथील निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले आहेत. यापूर्वी देखील, दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या पथकाने आसाममधील मोरीगाव आणि दिब्रुगड येथे वेगवेगळ्या छाप्यांमध्ये दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले होते. ज्यामध्ये शिक्षणाधिकारी आणि जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक होते.
https://twitter.com/gpsinghips/status/1554731205269983234?s=20&t=EHAi2CwOVuExyq1RVj_Ikw
छापेमारीचं वृत्त मिळताच रेंजर गोगोई आपल्या कार्यालयातून लाचेची रक्कम घेऊन पळून जाऊ लागला. साधारणतः १ किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर टीमला त्याला पकडण्यात यश आलं. देवव्रत गोगोईने पळ काढण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र शेवटी भ्रष्ट्राचार विरोधी टीमने त्याला पकडलं. आसाम पोलिसांच्या विशेष महानिर्देशक जीपी सिंह यांनी या अभियानाबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. सध्या रेंजर गोगोईची चौकशी केली जात आहे.
Anti Corruption Raid Officer Fly Away Video
Assam Vigilance Team