शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना आहेत तरी काय? असा घ्या लाभ

by Gautam Sancheti
जून 16, 2022 | 5:00 am
in राज्य
0
annabhau sathe

 

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना आणि बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्याकरीता सन 2022-2023 आर्थिक वर्षासाठी 60 लाभार्थींचे उद्दीष्ट देण्यात आले असून त्यापैकी 50 लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट व 10 लाभार्थींना बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे. केंद्रिय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी असावे.

राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदाराने महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील पती वा पत्नी या दोघांपैकी एकालाच महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

अर्जाचा नमुना कार्यालयात मोफत उपलब्ध आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा, जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, वाहन व्यवसायकरीता ड्रायव्हींग लायसन्स व आरटीओकडील प्रवाशी वाहतुक परवाना, वाहन व्यवसायाबाबत वाहनाच्या बुकींगबद्दल, किंमतीबाबत अधिकृत विक्रेता कंपनीकडील दरपत्रक, व्यवसायसंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, व्यवसायासंबधी प्रकल्प अहवाल , खरेदी करावयाच्या मालाचे, कोटेशन, प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर) सादर करावे. विहित नमून्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात सादर करावे.

महामंडळाच्या अनुदान, बीजभांडवल योजना करीता लाभार्थीकडून प्राप्त झालेल्या सर्व कर्जप्रकरणे गठीत केलेल्या लाभार्थी निवड समितीसमोर ठेवण्यात येतात. समितीने मंजूर केलेले प्रस्ताव कर्ज मंजूरीसाठी महामंडळामार्फत राष्ट्रीयकृत बँकेकडे शिफारस केले जातात.

अनुदान योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्जप्रकरणांत महामंडळाकडून प्रकल्पखर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार यापैकी कमी असलेले अनुदान देण्यात येते. बॅंककर्ज अनुदान वगळून बाकीचे सर्व रक्कम बॅंकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते.

बीजभांडवल योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 7 लाखापर्यंत आहे. मंजूर कर्जप्रकरणांमध्ये 10 हजार अनुदान वगळता उर्वरीत कर्ज राशीमध्ये 5 टक्के अर्जदाराचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (रु. 10 हजार अनुदानासह) 75 टक्के बँकेचे कर्ज असेल. बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज 4 टक्के व्याजासह महामंडळाकडे परतफेड करावयाचे आहे. संबंधित नागरीकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – सेल्समनला महिलेचे उत्तर

Next Post

रिलायन्स जिओ आणि झोमॅटो यांच्यात करार; ग्राहकांना देणार ही सुविधा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
jio

रिलायन्स जिओ आणि झोमॅटो यांच्यात करार; ग्राहकांना देणार ही सुविधा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011