इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमदार सुरेश धस आणि मंत्री धनजंय मुंडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर सुरेश धस यांनी देखील धनजंय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. दरम्यान सुरेश धस यांना चारीबाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे. मनोज जरांगे यांनी ज्या मराठ्यांनी मोठं केलं, त्यांच्या अन्नात माती कालवली असे म्हटले आहे.
तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार? मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पालटतील. मी हे धनंजय देशमुख ह्यांना देखील म्हटले होते.
आज प्रश्न पडतो की धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? इतक्या मोर्च्यांमध्ये गेलात, इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते? किळस आली आहे ह्या सगळयांची