India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यात आता अंगणवाडी दत्तक योजना; मंत्री लोढा यांची घोषणा

India Darpan by India Darpan
October 5, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी प्रधान सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, उपसचिव वि.रा. ठाकूर यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे 140 सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, अंगणवाडी दत्तक धोरणामुळे अंगणवाडीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ होऊन सुदृढ बालक व मातांनाही चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल.अंगणवाडी दत्तक धोरणातील भौतिक सुविधांमध्ये इमारत बांधणी, दुरुस्ती, रंगरंगोटी, कुंपण, शौचालय, पाणीपुरवठा इ., शालेय शैक्षणिक सुविधांमध्ये देशी बनावटी खेळ साहित्य, खुर्ची, बसकरपट्टया, सतरंजी, रंगीत टी.व्ही. कृति पुस्तिका, बालकांची वजन व उंची मोजण्याची साधने, प्रशिक्षण व कौशल्याकरिता सहाय्य, आरोग्य तपासणी शिबिर, अंगणवाडी केंद्रांच्या व लाभार्थींच्या आवश्यकतेनुसार सहाय्य करणे. या बाबींसाठी सीएसआर मधून निधी देता येईल.

मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत अंगणवाडी केंद्रांद्वारे पूरक पोषण आहार,लसीकरण, आरोग्य तपासणी,अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण,आरोग्य व आहार शिक्षण या पाच सेवा देण्यात येतात.अंगणवाडी दत्तक धोरणामुळे यामध्ये वाढ होऊन सीएसआर मधून निधी देणाऱ्यासंस्था तसेच सेवाभावी संस्थाना या क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके व तीने ते सहा वर्षातील सुदृढ बालक व निरोगी माता यांना त्याचा लाभ होणार असून राज्याची बालक व मातांना यामुळे अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देता येतील.

Anganwadi Adoption Scheme in Maharashtra
Mangal Prabhat Lodha


Previous Post

विद्यार्थ्यांनो, राज्य सरकारच्या या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा नक्की लाभ घ्या

Next Post

मार्क झुकरबर्गच्या या वाईट सवयींमुळे अनेक कर्मचारी करताय फेसबुकला रामराम

Next Post

मार्क झुकरबर्गच्या या वाईट सवयींमुळे अनेक कर्मचारी करताय फेसबुकला रामराम

ताज्या बातम्या

डोंबिवलीहून नवी मुंबई आता अवघ्या काही मिनिटांत; पारसिक बोगदा दोन्ही बाजूने खुला

January 27, 2023

अनेक दशके झाली तरी वेठबिगारीचं भूत आदिवासींच्या मानगुटीवर का आहे? त्याचं मूळ नक्की कशात आहे?

January 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज अचानक धनलाभाची चिन्हे; जाणून घ्या, शनिवार, २८ जानेवारीचे राशिभविष्य (सोबत रथसप्तमीचे महत्व)

January 27, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २८ जानेवारी २०२३

January 27, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – विद्यार्थ्याचे उत्तर

January 27, 2023

पिंपरी चिंचवडमध्ये ईडीचे छापे! आता कुणावर झाली कारवाई? आणि का?

January 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group