मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादामुळे संपूर्ण राज्यभरात चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एण्ट्री घेतली आहे. राज यांनी भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज यांनी अचानक असे पत्र लिहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हचले आहे की, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा. भाजपने ही निवडणूक लढवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असे राज्य यांनी पत्रात नमूद केले आहे.
या निवडणुकीत भाजपने नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्येच ही लढत होत आहे. मात्र, लटके यांच्या उमेदवारी आणि त्यांच्या महापालिकेच्या राजीनाम्यावरुन यापूर्वी बराच वाद झाला आहे. त्यातच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नसला तरी ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक सध्या विशेष चर्चेत आहे. अशा परिस्थितीत राज यांनी थेट भाजप उमेदवाराला माघार घेण्याची विनंती केली आहे.
राज यांनी पत्रात म्हटले आहे की, कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की, भाजपने ही निवडणूक लढवू नये. आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा या आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्योत निवडणूक न लढविण्याचं धोरण स्विकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं, असे राज यांनी पत्रात नमूद केले आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1581550925188956160?s=20&t=sqAoFioV0fI4Tjfn-lOmOw
Andheri Election Raj Thackeray Latter to Devendra Fadnvis
BJP Bypoll Rutuja Latke