विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रत्येक गाण्याची एक कहाणी असते, किंबहुना एक गंमत असते. ते गाणे तयार करण्यापासून ते गाणे चित्रपटात असो की एखाद्या स्टेजवर सादर होईपर्यंत त्याचा एक अनोखी प्रवास असतो. त्यातही काही गाणी ही अत्यंत सुपरहिट होतात किंबहुना लोकप्रिय होतात, त्यामागे काही किस्से असतात. असाच एक छान किस्सा ‘मिस्टर नटवरलाल ‘ या चित्रपटातील ‘परदेशीया ये सच है पिया …’ या गाण्याचा किस्सा आहे.
त्याकाळी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे फक्त काही तारखा शिल्लक राहिल्या होत्या. चित्रपटाचे प्रसिद्ध निर्माता टिटो यांनी दिग्दर्शक राकेश कुमार यांच्याशी बोलून ‘राम बलराम’ चित्रपटाच्या शूटिंग मधून उरलेल्या तीन महिन्यांत नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाचा निर्णय घेतला. आणि असा तातडीने बनलेल्या चित्रपटाचे नाव होते, ‘मिस्टर नटवरलाल’. विशेष म्हणजे ८ जून १९७९ रोजी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला.










