अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दर्यापूर मार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर रात्री भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी झाले. टाटा एस या वाहनामध्ये बसून १२ प्रवासी प्रवास करीत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक ट्रक येत होता. या ट्रकने टाटा एसला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाहनाचा चुरा झाला. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला.
जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले. यात लहान मुलाचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलविले. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करताहेत.
Amravati Road Accident Truck tata Ace