अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी कृषिमंत्री तसेच विद्यमान खासदार अनिल बोंडे यांनी शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमात केलेला राडा चांगलाच व्हायरल झाला आहे. बोंडे यांची व्यासपीठावरच शिवव्याख्यात्यासोबत शाब्दीक चकमक झाल्याने नवीन वाद उफाळला आहे.
१९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पार पडलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला आहे. खासदार अनिल बोंडेंनी शिवव्याख्याता तुषार उमाळे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेत “तू मूर्ख आहेस का?” असं विचारलं. यावर उमाळे यांनीही बोंडे यांना त्यांच्याच भाषेत सुनावत “तुम्ही मूर्ख आहात का?” असा सवाल केला. तुषार उमाळे भाषण करत असताना शिवाजी महाराज मुस्लिमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होते.
त्यावेळी बोंडे यांनी आक्षेप घेत,“ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का?” असे विचारले. यावर संबंधित तरुणाने खासदार अनिल बोंडे यांनी उलट उत्तर दिलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा प्रतिप्रश्न विचारला. प्राप्त माहितीनुसार, संतप्त झालेले बोंडे शिवव्याख्याते तुषार उमाळे या तरुणावर धावून गेले. पण उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत, परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल बोंडे पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसल्यानंतर संबंधित तरुणाने भरमंचावरून अनिल बोंडे यांना सुनावले.
“मी तुम्हाला घाबरत नाही. राज्यघटनेने आम्हाला स्वातंत्र्य दिले आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडिलधारी आहात, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधण आणणार,” अशा शब्दांत तुषार उमाळेनं खासदार अनिल बोंडे यांना सुनावले.
असे होते उमाळे यांचे भाषण
“शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने दाखवायचं, हेच आमच्या लोकांना कळलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमद्वेष्टे होते, असे दाखवण्यचा प्रयत्न केला जातो. महाराज कुठल्याही जाती धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचे स्वराज्य निर्माण केले होते.
https://twitter.com/Sandeepkhot10/status/1627955538528182273?s=20
Amravati MP Anil Bonde and Speaker Umale Conflict