India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

व्यासपीठावरच भिडले! शिवव्याख्याते उमाळे आणि खासदार बोंडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
February 22, 2023
in संमिश्र वार्ता
0

अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी कृषिमंत्री तसेच विद्यमान खासदार अनिल बोंडे यांनी शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमात केलेला राडा चांगलाच व्हायरल झाला आहे. बोंडे यांची व्यासपीठावरच शिवव्याख्यात्यासोबत शाब्दीक चकमक झाल्याने नवीन वाद उफाळला आहे.

१९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पार पडलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला आहे. खासदार अनिल बोंडेंनी शिवव्याख्याता तुषार उमाळे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेत “तू मूर्ख आहेस का?” असं विचारलं. यावर उमाळे यांनीही बोंडे यांना त्यांच्याच भाषेत सुनावत “तुम्ही मूर्ख आहात का?” असा सवाल केला. तुषार उमाळे भाषण करत असताना शिवाजी महाराज मुस्लिमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होते.

त्यावेळी बोंडे यांनी आक्षेप घेत,“ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का?” असे विचारले. यावर संबंधित तरुणाने खासदार अनिल बोंडे यांनी उलट उत्तर दिलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा प्रतिप्रश्न विचारला. प्राप्त माहितीनुसार, संतप्त झालेले बोंडे शिवव्याख्याते तुषार उमाळे या तरुणावर धावून गेले. पण उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत, परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल बोंडे पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसल्यानंतर संबंधित तरुणाने भरमंचावरून अनिल बोंडे यांना सुनावले.

“मी तुम्हाला घाबरत नाही. राज्यघटनेने आम्हाला स्वातंत्र्य दिले आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडिलधारी आहात, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधण आणणार,” अशा शब्दांत तुषार उमाळेनं खासदार अनिल बोंडे यांना सुनावले.

असे होते उमाळे यांचे भाषण
“शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने दाखवायचं, हेच आमच्या लोकांना कळलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमद्वेष्टे होते, असे दाखवण्यचा प्रयत्न केला जातो. महाराज कुठल्याही जाती धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचे स्वराज्य निर्माण केले होते.

भाजप खासदार अनिल बोंडे याने संभाजी ब्रिगेडचे संघटक व शिवव्याख्याते तुषार उमाळे यांचे व्याख्यान मध्येच तोडुन जेव्हा त्यांना "तु मुर्ख आहेस का?" अशी अरेरावीची भाषा वापरली तेव्हा तिथे जोरदार घमासान झाले व खासदार बोंड्याचा अमरावतीकरांनी नंतर आलुबोंडा केला.#संभाजीब्रिग्रेड
😆 pic.twitter.com/GyJ6Kd7lqN

— Sandeep khot (@Sandeepkhot10) February 21, 2023

Amravati MP Anil Bonde and Speaker Umale Conflict


Previous Post

अखेर पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांनी मौन सोडले; स्पष्ट सांगून टाकलं…

Next Post

तुर्कीप्रमाणेच उत्तराखंडमध्ये येऊ शकतो भूकंप; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, देवभूमीवर पुन्हा संकटावे सावट!

Next Post

तुर्कीप्रमाणेच उत्तराखंडमध्ये येऊ शकतो भूकंप; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, देवभूमीवर पुन्हा संकटावे सावट!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group