इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील एक मोठे नाव असलेल्या अंबानी घराण्यात शुभकार्य होते आहे. इशा अंबानीनंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे लग्न होत आहे. अंबानी यांचे चिरंजीव अनंतचे लग्न राधिका मर्चंट हिच्याशी होत आहे. हे दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. २९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्यात रोका झाला. राधिका मर्चंट कोण आहे आणि तिची एकूण संपत्ती किती आहे याचीच माहिती आम्ही देणार आहोत.
एनकोअर हेल्थकेअरचे सीईओ विरेन मर्चेंट यांची मुलगी म्हणजे राधिका. राधिका या एनकोअर हेल्थकेअरच्या संचालिका आहेत. राधिकाला शास्त्रीय नृत्याची आवड आहे. त्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे. पोहणे, नृत्य ही तिची आवड आहे. सध्या ती कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. तिचा होणारा नवरा अनंत अंबानी हा तिचा लहानपणीचा मित्र आहे. २०१८ मध्ये या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून या दोघांचे नाव समोर आले.
राधिकाचा जन्म मुंबईत झाला. १८ डिसेंबर १९९४ रोजी राधिकाचा जन्म झाला. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतच झाले. कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूल, इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण तिने परदेशात पूर्ण केले. राधिकाच्या आईचे नाव शैला मर्चंट तर वीरेन मर्चंट हे तिचे वडील आहेत. वीरेन मर्चंट हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. राधिका ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार राधिकाची एकूण संपत्ती ८ – १० कोटींच्या जवळपास आहे. तर तिच्या वडिलांची एकूण संपत्ती ७५५ कोटींहून अधिक आहे. राधिकाचे राहणीमान खूपच लक्झरी असल्याची चर्चा आहे. भावना ठाकर यांच्याकडून राधिकाने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. त्यांचे कुटुंब गुजरातमधील कच्छ भागातील आहे.
मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत ऊर्जा क्षेत्रात उतरणार आहे. या क्षेत्रासाठी रिलायन्स समूहाने दीर्घकालीन योजना आखली आहे. राधिका हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. तर अनंतने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. अंबानी आणि मर्चंट कुटुंबियांनी यंदा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अरंगेत्रमचे आयोजन केले होते. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीताचा विद्यार्थी जेव्हा पदवीदान समारंभात प्रथमच रंगमंचावर सादरीकरण करतो तेव्हा त्याला अरंगेत्रम म्हणतात. राधिकाने पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्म केले होते. राधिकासाठी हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी हा भव्य अरंगेत्रम सोहळा आयोजित केल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह, आमिर खान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.
Ambani Family Daughter In Law Radhika Merchant Lifestyle Property