शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

३०० वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट…अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

by India Darpan
सप्टेंबर 28, 2024 | 1:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ambadas danve


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात ओरछा नरेश महाराजा पहाडसिंग यांच्या काळात बांधली गेलेली साधारण ३०० वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे ही मंदिरे विद्यापीठाच्या स्थापनेच्या पूर्वीची आहेत, हे आजच्या सो-कॉल्ड हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना, विद्यापीठाला माहिती नाही काय? शिंदे-फडणवीस सरकारला ही औरंगजेबी वृत्ती पटते का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, सोळाव्या शतकातील गणपती, मारुती आणि भैरवाच्या मूर्ती असलेले तळ्यातले गणपती मंदिर, प्राचीन बारवेच्या काठावर सती शिळा असलेले सती माता मंदिर, १०० वर्षे जुनी बंगाली बाबाची समाधी, मल्लाव आणि बुंदेल समाजाचे कुलदैवत असलेले पुरातन चतुःशृंगी मंदिर अशी एकूण नऊ मंदिरे विद्यापीठासाठी जमीन अधिग्रहण करताना महसुली दप्तरात नोंदवली गेली नाहीत असे सांगून ही पडझड करण्यात येत आहे. एका अर्थाने औरंगजेबी वृत्तीला पोसण्याचा हा प्रकार आहे.

या मूर्ती आणि मंदिरे किती प्राचीन आहेत हे परिसरातील कोणत्याही जुन्या नागरिकाला, एखाद्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला देखील कळेल अशी आहेत. समाजाच्या भावना भडकावून काड्या सारणाऱ्या लोकांच्या तक्रारीवरून विद्यापीठाने आपापसात बसून एक थातूर-मातूर समिती स्थापन केली आणि ही मंदिरे अतिक्रमण ठरवली गेली आणि आता ही मंदिरे पाडून या जागा लाटण्याचा डाव विद्यापीठाचा आहे. विशेष म्हणजे एवढे नावाजलेले राज्य पुरातत्व विभागाचे कार्यालय विद्यापीठ आवारात असताना या समितीत एकही पुरातत्वीय विषयाचा जाणकार नसल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या हेतूवर शंका येणे साहजिक आहे.

मंदिरांभोवीत अतिक्रमण असेल तर मा. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात ते काढायला कुणाचा आक्षेप असण्याचे कारणच नाही. पण इतिहासाची साक्ष सांगणारी मंदिरे अशी मुळासकट पाडली जाणे, हे संतापजनक आहे. आपापसात ठरवून अशी इतिहासाची पाडापाडी करता येणार नाही. राज्य पुरातत्व खात्याकडून या मुर्त्या आणि समाध्यांचा काळ विचारात घेऊनच ही कारवाई व्हायला हवी. असे कुणाच्याही मनात येईल ती मंदिरे आम्ही पाडू देणार नाही. महामहीम राज्यपाल महोदय आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी विनंती देखील दानवे यांनी केली आहे.

तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या छत्रछायेत विद्यापीठाची औरंगजेबी वृत्ती!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात ओरछा नरेश महाराजा पहाडसिंग यांच्या काळात बांधली गेलेली साधारण ३०० वर्षे जुनी मंदिरे अतिक्रमण ठरवून ती पाडण्याचा घाट विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाने घातला… pic.twitter.com/Rt8rhSu6eh

— Ambadas Danve (@iambadasdanve) September 28, 2024

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमधील अशोका बिडकॅानवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले हे गंभीर आरोप

Next Post

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा…विशेष न्यायालयाचे आदेश

Next Post
nirmal sitaraman

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा…विशेष न्यायालयाचे आदेश

ताज्या बातम्या

IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011