वाशिंग्टन – जगात अनेक श्रीमंत लोक आहेत, तसेच दानशूर लोक देखील आहेत. परंतु श्रीमंत लोक दानशूर असतीलच असे नाही. परंतु जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या महिलेने आपल्या संपत्तीतील प्रचंड मोठी रक्कम भारतातील अनेक संस्थांना दान किंवा देणगी म्हणून दिली आहे. कोण आहे ही महिला ? त्या जगातील सर्वात श्रीमंत महिला आणि अॅमेझॉन चीफ जेफ बेझोस यांच्या पहिल्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट आहेत. त्यांनी संपत्तीमधून सुमारे 19,800 कोटी रुपये ($ 2.7 अब्ज डॉलर्स ) देणगी दिली आहे.
मॅकेन्झी स्कॉट यांनी दिलेली वर्षभरातील ही तिसरी मोठी देणगी आहे. भारतासह जगातील अनेक देशांच्या 286 धर्मादाय संस्थांना मदत मिळणार असून सदर पैसे भारतासह अनेक देशांतील विविध संस्था, विद्यापीठे आणि कला गटांना जातील. सामाजिक कार्य व परोपकारासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅकेन्झी याबद्दल माहिती देताना म्हणाल्या की, श्रीमंत लोकांनी आपली अधिक संपत्ती काही आठवड्यां पर्यंत मर्यादित न ठेवल्यास जगाचे भले होईल. विशेष म्हणजे मॅकेन्झीची स्वतःची कोणतीही सेवाभावी संस्था नाही, परंतु ती ही रक्कम खाजगीरित्या दान करीत आहे.









