विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लॉकडाउनमधून हळूहळू बाहेर पडणाऱ्या देशांच्या आता अल्फा अवतारातील विषाणूने चिंता वाढविल्या आहेत. वेगाने फैलावण्याच्या त्याच्या गूढतेबाबत संशोधकांनी एका अभ्यासात उलगडा केला आहे. कोरोनाचे हे रूप शरीरात स्वतःला अदृश्य ठेवते. सर्वात प्रथम हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला निष्क्रीय करतो. त्यामुळे त्याला शरीरात प्रतिकार होत नाही आणि आपोआपच त्याची ताकद वाढण्यासाठी जास्त वेळ मिळत आहे.
आढळले तब्बल २३ म्युटेशन
ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात म्हटले की, अल्फा विषाणूचे २३ म्युटेशन आढळले आहेत. ते इतर कोरोना विषाणूपेक्षा वेगळे आहेत. ब्रिटेनमध्ये या विषाणूचा फैलाव झाल्यानंतर संशोधकांनी संशोधन सुरू केले. इतर विषाणूंच्या अवतारांशी तुलना करताना वेगाने फैलाव होण्याचे कारण शोधण्यासाठी त्याच्या अनुवांशिक बदलांचे निरीक्षण करणे सुरू केले होते. कोणत्याही विषाणूचे यश शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. जो विषाणू जितका प्रभावी असतो, तो त्याच वेगाने संसर्गाचा प्रसार करतो, असे येल स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. मौडी लॉरेंट रोल सांगतात. अनेक संशोधकांनी अल्फा विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये बदल करणार्या नऊ म्युटेशनवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी एक म्युटेशन अल्फाला पेशींपेक्षा जास्त घट्ट आवळून घेण्यास मदत करत आहे.
इंटरफेरॉनची निर्मिती कमी
शररीरातील रोगप्रतिकारक शक्तीला अल्फा विषाणू कसा प्रभावित करत आहे, हे काही संशोधकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. लंडन विद्यपीठातील ग्रेगरी टॉवर्स आणि त्यांच्या सहकार्यांनी
मानवी फुफ्फुसांच्या पेशींमध्ये कोरोना विषाणू विकसित केले. नंतर अल्फा विषाणूने संक्रमित पेशींची तुलना कोरोना विषाणूच्या जुन्या अवतारांनी संक्रमित पेशींशी केली. त्यावर संशोधकांना आढळले की, अल्फा संक्रमित फुफ्फुसाच्या पेशींनी खूपच कमी इंटरफेरॉन (विषाणूपासून सुरक्षित ठेवणारे प्रोटिन) बनविले.
अदृश्य ठेवण्यात यश
टॉवर्स सांगतात, कोरोनाच्या अल्फा रूपाच्या उपस्थितीमुळे रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात आल्याची सूचना मिळत होती. हा अवतार स्वतःला अदृश्य ठेवण्यात यशस्वी होतो. अल्फा संक्रमित पेशींनी अन्य रूपांच्या तुलनेत ओआरएफ९बी जीनच्या जवळपास ८० पट अधिक प्रत बनविल्या आहेत, असे संशोधकांना आढळले.
रोगप्रतिकारक शक्ती
कोरोनाच्या अल्फा रूपातील एक म्युटेशन ओआरएफ९बी प्रोटिनच्या अधिक निर्मितीवर भर देतो. तो इंटरफेरॉनचे उत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्तीला कमजोर करतो. त्यामुळे अल्फा सहजरित्या आपली ताकद वाढविण्यास सुरुवात करतो. संक्रमित पेशी हळूहळू ओआरएफ९बी प्रोटिन हटवू शकते. संक्रमणाच्या १२ तासानंतर रोगप्रतिकारक शक्ती अलार्म पुन्हा रूळावर येऊ लागतो. परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो.