मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वातावरणातील मोठ्या बदलामुळे महाराष्ट्राच्या अर्ध्या भागांमध्ये हिवाळ्यात पासवाळा अनुभवायला येत आहे. एकीकडे पारा घसरलेला आहे आणि दुसरीकडे तुरळक पाऊसही येत आहे. पुढचे काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल अनुभवायला आले. यावर्षी तर अगदी हिवाळा सुरू होईपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिवाळा देखील जास्त दिवस राहणार, असा अंदाज लावण्यात आला. मात्र, निसर्गाच्या जादूपुढे कुणाचेच चालत नाही. मुंबईसारख्या दमट वातावरण असलेल्या शहरात अचानक तापमान १५ अंशांवर आले आणि आता हलक्या सरीही कोसळणार आहेत. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या माथेरानला लोक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखतात. माथेरानमधले तापमान १८ अंश असताना मुंबईतील तापमान १५ अंशांवर मोजण्यात आले आहे. त्यामुळे कधी नव्हे तेवढी थंडी मुंबईकरांच्या वाट्याला येत आहे.
उत्तर भारतातून आली लाट
उत्तर भारतातील थंडी जबरदस्त असते. आणि गेले दोन दिवस महाराष्ट्र अश्याच काहीश्या थंडीचा अनुभव घेत आहे. धुक्याची चादर पांघरलेली आहे आणि थंडगार वारा वाहतो आहे, असे वातावरण आहे. उत्तर भारतातून राजस्थान, गुजरात आणि कोकणातून महाराष्ट्रात या थंडीचा प्रवास सुरू आहे.
अभी तो झाँकी है
हे वातावरण आणखी दोन दिवस म्हणजे ६ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. यात मुंबई, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, खान्देश, कोकण, अहमदनगर या शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा घसरलेले दिसणार आहे.
बाकी शहरं जैसे थे
अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस आणि थंडी या दोन्हींची बरसात होणार असली तरीही उर्वरित महाराष्ट्रात ना थंडी ना पाऊस असे वातावरण असणार आहे. उलट थंडीचे दिवस असूनही उकाडा सहन करावा लागत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेले दोन दिवस नागपुरातील तापमान अचानक कमी झाले आहे. नाहीतर हिवाळा सुरू झाला तरी फॅन बंद झालेले नव्हते.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1610667252638158848?s=20&t=G2Rp92khSxAUGWVwFIsWgg
Alert Rainfall Winter Cold Weather Forecast