मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावत असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असे नाव दिले आहे. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास ते ८५ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र आणि गुजरातलाही फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याची सुरुवात मुंबईमध्ये हलक्या पावसाच्या हालचालींसह होण्याची शक्यता आहे. आयएमडीने आपल्या पाच दिवसांच्या जिल्ह्याच्या अंदाजात म्हटले आहे की १२ डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याबाबत ठाण्याच्या तज्ञांनी सांगितले की, या पावसाचे कारण चक्रीवादळ आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1601189493918531584?s=20&t=gKJ7eLn62UoEOHFGCQBBVw
महाराष्ट्रात पडू शकतो पाऊस..
मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ ते १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे. त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1601073612554805248?s=20&t=QQiCM4OWCQGeAeepE-onIA
Alert Mandous Cyclone Maharashtra Rainfall Forecast
Unseasonal Rain Climate Weather IMD