मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वातावरणात झपाट्याने बदल होतो आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा आरोग्यावर परिणाम होतो आहे. शेती पिकांना देखील फटका बसतो आहे. अशातच हवामान विभागाकडून २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस येणार असल्याने त्रास अधिकच जाणवण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यभरात थंडीचा अनुभव येतो आहे. पण, त्यात सातत्याने फेरबदल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत आहे. यामुळे वाहने चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते आहे. शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण या पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पिकांवर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्यची शक्यता आहे.
थंडी ओसरण्याची चिन्हे
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या कठीण स्थितीत उत्तर भारतीयांसाठी दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान उत्तर भारतात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1616748255374893065?s=20&t=A9zokmueiqin8fWYT0fs1Q
Alert IMD Rainfall Winter Climate Forecast