नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाऊंट सक्तीचे आहे. तुमचेही डिमॅट अकाऊंट असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. आजपासून तुमचे डिमॅट अकाऊंट बंद होऊ शकते. यासंदर्भात ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
शेअर बाजारातून पैसे कमवायचे असतील तर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सहसा जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्या नव्या गुंतवणूकदारांना वाटते की ते अल्पावधीत मजबूत नफा कमावू शकतात. अनेक वेळा असे घडते की काही तासांत स्टॉकमधून मोठा नफा कमावला जातो. या उलट मोठे नुकसानही सहन करावे लागत आहे. शेअरची खरेदी-विक्री करायला आपल्याला ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट लागते. शेअरची खरेदी विक्री स्टॉक एक्सचेंज मध्ये होते. ती आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही करू शकतो. शेअर मार्केटची सुरवात करायला आपल्याकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.
आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती आहे. त्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन केले नसेल तर डीमॅट खाते हाताळणे अडचणीचे ठरेल. राष्ट्रीय शेअर बाजाराने १४ जून रोजी परिपत्रक काढले होते. त्यात ३० सप्टेंबरपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. ते केले नसल्यास त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करण्यात अडचणी येऊ शकतात.
डिमॅट खातेधारकाने दिलेल्या तारखेपर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम न केल्यास काय होईल याबद्दल काहीही नमूद केलेले नसले तरी, लॉग इन करण्यासाठी प्रमाणीकरण घटकांपैकी एक म्हणून “सदस्यांनी प्राधान्याने बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरावे” असे परिपत्रकात नमूद केले आहे. NSE ने दिलेल्या माहितीनुसार, खातेदारांना डिमॅट खात्यात लॉगइन करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फॅक्टर वापरावे लागते. दुसरा मार्ग हा नॉ़लेज फेक्टरचा आहे. पासवर्ड अथवा पिनच्या माध्यमातून खातेदार लॉग इन करतो. वन टाईम पासवर्ड (OTP), सिक्युरिटी टोकन यामाध्यमातूनही लॉग इन करता येते.
ई मेल आणि एसएमएस या दोन्ही माध्यमातून ओटीपी मिळेल. त्याआधारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शक्य होईल. तसे न झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करुन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे लागेल. NSE च्या परिपत्रकानुसार, ३० सप्टेंबरपूर्वी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करणे आवश्यक आहे. त्याआधारे गुंतवणूकदाराने डीमॅट खात्यात लॉगिन करणे अनिवार्य आहे. तसेच NSEने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार, टू फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी ईमेल आणि एसएमएस माध्यमातून ओटीपी मिळेल. नेटवर्क एररमुळे ही प्रक्रिया खंडीत झाल्यास पासवर्ड, ओटीपी, पिन, सिक्युरीटी टोकन, युजर आयडी यांचा वापर करता येईल.
NDSLआणि CDSL यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना दाखल होण्यापूर्वी म्हणजेच मार्च २०२० मध्ये शेअर बाजारात ४.०९ कोटी डीमॅट खाती होती. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात हा आकडा ६ कोटींवर पोहचला. आता हा आकडा १० कोटींच्या पुढे गेला आहे.
बायोमेट्रिक प्रमाणीकरण शक्य नसलेल्या प्रकरणांमध्ये, सदस्यांनी २-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) साठी वापरकर्ता आयडी व्यतिरिक्त वर नमूद केलेले दोन्ही घटक वापरावेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की उपरोक्त प्रमाणीकरण क्लायंटद्वारे IBT आणि STWT च्या प्रत्येक लॉगिन सत्रावर लागू केले जाईल, असे NSE नोटीसमध्ये म्हटले आहे.
Alert Dmat Account Closed 1 October 2022
New Rule Two Factor Authentication