मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याचा इशारा यापूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. यासंदर्भात आज विभागाने महत्त्वाची माहिती सादर केली आहे. त्यात या चक्रीवादळाची निर्मिती आणि त्याचा पुढील प्रवास याचा समावेश आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, अग्नेय बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. उद्या ८ मे रोजी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ वायव्येकडे १० मेपर्यंत सरकेल. नंतर ते उत्तर-ईशान्य दिशेला वळेल. त्यामुळे ते ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर असलेल्या बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा या राज्यांना केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1522845511836848128?s=20&t=DmNmoFUDSiUUoJvZHw_HDw