नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी नाशिक दौ-यावर असून सकाळी ८ वाजता त्यांचे ओझर विमातळावर आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये देवळाली विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा, उधोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम, या सह राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल, स्वच्छ ग्राम स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व खरीप आढावा बैठक ते घेणार आहे.
सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकटे यांची मुलगी व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी यांच्या विवाहसोहळ्या निमित्त आयोजित स्वागत समारंभाला ते उपस्थितीत राहणार आहे.
दहा तासाच्या या दौ-यानंतर ते सायंकाळी ६ वाजता ओझर विमानतळावरुन पुणे येथे रवाना होणार आहे.
असा आहे त्यांचा सुधारीत दौरा