इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअरटेल कंपनी सध्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत, त्यातच आता एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँडकडे ग्राहकांना हाय-स्पीड डेटा ऑफर करणार्या योजनांची विस्तृत श्रेणी दिली आहे. काही योजना विविध OTT मनोरंजन साधनांच्या एका वर्षाच्या सदस्यतासह देण्यात येत आहेत.
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतात आणि 3999 रुपयांपर्यंत जातात. तसेच OTT सामग्रीचा प्रवेश 999 रुपयांच्या प्लॅनपासून सुरू होत असताना, डिस्ने प्लस हॉटस्टार हे केवळ एअरटेल Thanks अॅपवर ऑफर केले जाते आणि ग्राहकांना एअरटेल वेबसाइटवर हा लाभ मिळू शकत नाही. एअरटेल ब्रॉडबँड योजनावर डिस्ने प्लस हॉटस्टारचे एक वर्षाचे सदस्यत्व देतात.
999 ब्रॉडबँड योजना
एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँड ही 999 रुपयांची योजना म्हणजे एक मनोरंजन योजना असून ती 200 एमबीपीएस पर्यंतचा वेग आणि अमर्यादित स्थानिक आणि एसटीडी कॉलसह अमर्यादित डेटा ऑफर करते. एअरटेल थँक्स बेनिफिट म्हणून, प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राईम, डिस्ने प्लस हॉटस्टारचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, अमर्यादित डाउनलोडसह Wynk अॅप, शॉ अकादमीवरील कोर्स, FASTag आणि एअरटेल स्टोअर्स आणि ग्राहक सेवा केंद्रे यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
1499 ब्रॉडबँड योजना
एअरटेल ग्राहकांना 1,499 रुपयांच्या एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँड प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम एक वर्षासाठी प्रवेश मिळू शकतो. याला प्रोफेशनल प्लॅन देखील म्हटले जाते, हे एअरटेल थँक्स अॅप फायद्यांसह 999 रूपयांच्या एअरटेल ब्रॉडबँड प्लॅन प्रमाणेच आहे. डेटा आणि कॉल फायद्यांच्या बाबतीत, एअरटेलच्या 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 Mbps पर्यंत स्पीड आणि अमर्यादित कॉल्ससह अमर्यादित डेटा देखील मिळतो.
3999 ब्रॉडबँड योजना
या रेंजमधील सर्वात महाग एअरटेल एक्सस्ट्रीम ब्रॉडबँड प्लॅन 3999 रुपयांचा असून डिस्ने+ हॉटस्टार सदस्यत्व ऑफर करतो. 999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच, ग्राहकांना सर्व एअरटेल Thanks अॅप फायद्यां- व्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईम स्ट्रीमिंग सेवा एक वर्षाची देखील मिळते. तसेच हा प्लॅन अमर्यादित इंटरनेट आणि कॉलसाठी 1 Gbps पर्यंत हाय स्पीड ऑफर करतो.
शुल्क माफी शक्य
एअरटेलच्या 499 आणि 799 रुपयांच्या किंमती टॅगसह येणाऱ्या बेसिक आणि स्टँडर्ड प्लॅनमध्ये कोणतेही OTT स्ट्रीमिंग फायदे उपलब्ध नाहीत. ते त्यांचे अॅड-ऑन मोफत Wync म्युझिक, शॉ अकादमी आणि अमर्यादित FASTag वर एक वर्षाच्या प्रवेशापर्यंत मर्यादित करतात. सर्व एअरटेल ब्रॉडबँड प्लॅन विनामूल्य राउटरसह येतात. ग्राहकाला एअरटेल ब्रॉडबँडसाठी 1000 रुपये एक्टिव्हेशन किंवा इन्स्टॉलेशन फी भरावी लागेल. प्लॅन वापरकर्त्याने 6 किंवा 12 महिन्यांच्या वार्षिक भाडे योजनेची निवड केल्यास हे शुल्क माफ केले जाऊ शकते.