अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शेवगाव येथे रविवारी रात्री धार्मिक यात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. वाद इतका वाढला की, हिंसाचार आणि दगडफेक झाली. दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी ८ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना अहमदनगर शहरांपासून ८० किमी अंतरावर घडल्या आहेत. परिस्थिती पाहता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कारवाई करताना पोलिसांनी सुमारे ५० जणांना ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, एका गटाने मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. यानंतर अन्य गटाकडून धार्मिक स्थळावर दगडफेकही झाली आणि हिंसाचार उसळला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
#WATCH | Maharashtra: Visuals from Ahmednagar's Shevgaon where stone pelting was reported last night pic.twitter.com/4gmhvPyvqw
— ANI (@ANI) May 15, 2023
अकोल्यात शनिवारी दगडफेक
याआधी शनिवारी अकोला येथे एका इन्स्टाग्राम पोस्टवरून दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या काळात चोरट्यांनी अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन पोलिसांसह ८8 जण जखमी झाले.
संभाजीनगरमध्येही
२९ मार्चलाही अशीच घटना घडली होती. छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. या घटनेनंतर वाहनेही जाळण्यात आली. यासोबतच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात १० पोलिसही जखमी झाले आहेत. याच्या एका दिवसानंतर किराडपूरमध्येही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पोहोचले असता येथील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या.
Ahmednagar Shevgav Riot Clashes 8 Police Injured