शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी लाभक्षेत्रात उन्हाळी हंगामाकरीता १२ जूनपासून आवर्तन सुरु करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे जलसंपदा विभागास दिल्या. गोदावरी लाभक्षेत्रात आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोदावरी धरण समुहातील पाणी साठ्याचा आढावा महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सध्याच्या परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही गावांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच शेतीसाठीही पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात आवश्यक असल्याने पाण्याचे आवर्तन सोडावे. अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली होती.
जलसंपदा विभागांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सोमवार दिनांक १२ जून पासून तातडीने हे आवर्तन सोडण्याच्या सोडण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
Ahmednagar District Godavari Canal Water