अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार, १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
उदय शेळके यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून ते बेशुद्धावस्थेत होते. अखेर आज (दि.११ फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले.
अॅड.उदय शेळके यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. तसेच शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सहकार क्षेत्रातील उमदे व्यक्तीमत्व त्यांच्या रुपाने लोपले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
https://twitter.com/bb_thorat/status/1624339230058229760?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Ahmednagar DC Bank Chairman Uday Shelke Death