India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आग्रा येथील लाल किल्ल्यावर यंदा दणक्यात साजरी होणार शिवजयंती

पूर्ण खर्च अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन करणार

India Darpan by India Darpan
February 11, 2023
in राष्ट्रीय
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आग्रा येथील लाल किल्ल्यातील शिवजयंती सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सरकारने सह आयोजक होण्यास मान्यता दिली आहे. मान्यता देणारे पत्रही पुरातत्त्व खात्याला देण्यात आले आहे. आग्रा येथे होणाऱ्या शिवजयंतीचा पूर्ण खर्च शासनावर कुठलाही बोजा पडू न देता अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन करणार आहे. म

राठी भाषा मंत्री दीपककेसरकर यांच्यासह अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य सरकार सहआयोजक बनण्यास तयार असेल तर पुरातत्त्व विभागाने परवानगी द्यायला हरकत नाही असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन यांच्यासह महाराष्ट्र सरकारने शिवजयंती सोहळ्याचे सहआयोजक व्हावे अशी विनंती विनोद पाटील यांनी राज्य सरकारला केली होती. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आणि आता तसे पत्रही देण्यात आले आहे.

या सोहळ्याला राज्य सरकार तर्फे किती निधी द्यावा लागेल अशीही विचारणा सरकारतर्फे करण्यात आली होती. सरकारने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवल्याबद्दल धन्यवाद देत असतानाच आग्रा येथील शिवजयंती सोहळ्याचा पूर्ण खर्च अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर.आर.पाटील फाउंडेशन करेल, सरकारने फक्त सह आयोजकत्व स्वीकारल्याचे पत्र पुरातत्व खात्याला द्यावे अशी भूमिका विनोद पाटील यांनी मांडली होती. सरकारवर कुठलाही आर्थिक बोजा न टाकता एक शिवप्रेमी आणि शिवभक्त म्हणून विनोद पाटील, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर.आर. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने सहआयोजक होण्याचा निर्णय घेतला. त्या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगरानी,मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी आशिष कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे, यांच्यासह जयश्री भोज, राजिव निवतकर, विकास थोरात, तेजस गर्गे, बिभिषण चौरे असे या विषयासंबंधीच्या विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Agra Red Fort Shiv Jayanti Celebration


Previous Post

या आमदारावर ४०९ कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल तर, या माजी आमदाराची मालमत्ता ईडीकडून जप्त

Next Post

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन; हृदयविकाराचा तीव्र झटका पाठोपाठ ब्रेन स्ट्रोक

Next Post

अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन; हृदयविकाराचा तीव्र झटका पाठोपाठ ब्रेन स्ट्रोक

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group