अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पोखर्डी शेंडी गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मी माता मंदिरामध्ये गणपती बाप्पांची आरती सुरू असताना काही समाजकंटकांनी मंदिरावर दगडफेक केली. तसेच, गणपती मूर्तीची विटंबनाही केली. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. जखमी दोन्ही पुजारींना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंदिरातील पुजारी यांनी सांगितल्याप्रमाणे हल्ला करणारे सर्व लोक कागदोपत्री जातीने हिंदू आहेत. पण त्यांनी पूजा पद्धतीत बदल करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आरती बंद करा असे स्थानिक लोकांना सांगत मारहाण केली. सदरील हल्लेखोरानी नागापूर, अरंगाव, जेउर शेंडी व पोखर्डी येथे हल्ला केला. यामध्ये स्थानिक काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांना सर्व प्रकार सांगून सर्व पुरावे सादर करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सखोल चौकशी पोलीस विभाग करत आहे. पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी. अन्यथा याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटतील. मोर्चे, निदर्शने निघतील असा स्थानिक गावकऱ्यांकडून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू नागरिक उपस्थित होते.
Ahmednagar Crime Hindu Temple Attack Police Case
Religious Pokhardi Shendi Village