अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या लाचखोरीला मोठा ऊत आला असून त्यातून सहकार विभागही सुटलेला नाही. नगरच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक वर्ग २ किसन दिगंबर सागर (वय ५५) आणि तय्यब वजीर पठाण (वय ४८) खाजगी लेखा परीक्षक हे दोन्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. या दोघांनी ३ लाखाची लाच मागितली होती. तडजोडी अंती २ लाख निश्चित करण्यात आले. त्यातील १ लाख स्विकारताना हे रंगेहाथ सापडले आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक किसन सागर याला दिले होते. पतसंस्थेचे चेअरमन व त्यांचे नातेवाईक यांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी संबंधित चेअरमनकडे २ लाख लाचेची मागणी केली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम २ लाख करण्यात आली. त्याचवेळी तय्यब पठाण याने या सर्व बाबीला प्रोत्साहन दिले.
मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांची लाच देण्याची विनंती सागर याने केली. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. आणि नेवासा फाटा येथील बाळूमामा ज्युस सेंटर येथे सागर आणि पठाण यांनी १ लाख रुपये स्वीकारले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे.
सापळा अधिकारी:-
हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर*
*सापळा पथक* :-
पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड
मार्गदर्शक* –
*मा. शर्मिला वालावलकर ,पोलीस अधीक्षक
*मा.श्री नारायण न्याहळदे सो.
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक.
मा. नरेंद्र पवार सौ वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Ahmednagar ACB Trap Bribe Corruption 2 Arrested