अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला लाचखोर पोलिस हवालदार एकनाथ पंडित निपसे याचा एक कारनामा समोर आला आहे. एका गुन्ह्यात मुलाला अटक न करण्यासाठी या बहाद्दरने थेट ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर हा प्रकार थेट अँटी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) गेला. त्यानंतर निपसे हा एसीबीलाही नडला असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी अखेर लाचखोर निपसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार एकनाथ निपसे याने एका गुन्ह्यात संबंधित व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले तरच मुलाला अटक करणार नाही, अशी अट त्याने टाकली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने यासंदर्भात पुरावा गोळा करण्यासाठी नियोजन केले. तक्रारदाराकडे डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर देण्यात आले. लाचखोर निपसे याला ही बाब समजली. अखेर त्याने तक्रारदाराकडून हा डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर आणि त्यातील मेमरी कार्ड हिसकावून घेतले. तसेच तक्रारदाराला धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार एसीबीच्या निदर्शनास आला. त्यामुळे एसीबीने लाचखोर निपसे विरोधात लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुझील तपास सुरू आहे.
Ahmednagar ACB Bribe Corruption Police FIR