इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– गोदाकाठचे वैभव –
अहिल्यादेवी होळकरांचे न्यायालय
गोदाकाठी असलेले नाशिक हे विविध कारणांपासून ख्यात आहे. नाशिकचा इतिहास हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे. त्यातीलच विविध पैलू, घटना, घडामोड आपण जाणून घेत आहोत. आज आपण १७व्या शतकातील अतिशय महत्त्वाची बाब जाणून घेणार आहोत. ती म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचे न्यायालय….
सन 1765-1793 दरम्यान अहिल्यादेवी होळकरांचे नाशिक नगरीत न्यायालय (Court) भरत असे. अहिल्यादेवी होळकरांची अंतर्गत प्रशासनातील हातोटी व न्यायदानाची क्षमता अद्वितीय होती. असा उल्लेख ब्रिटिश अधिकारी जेम्स एम केमबेल यांनी गेझेटियरमध्ये केलेला आहे.
पुढे केमबेल म्हणतात की, नागरिकांच्या मूलभूत अधिकार संबंधित अहिल्यादेवी अतिशय जागृत होत्या. अहिल्यादेवी यांचे खुले कोर्ट (Open Court) पटांगणात भरत असे. सदरहू कोर्टात फिर्यादीचे म्हणणे अहिल्यादेवी स्वतः ऐकत असे. केस निकाली काढण्याची जबाबदारी त्यांच्या मंत्री गणांवर दिलेली होती. दोन्ही पक्षकारांची बाजू समजून घेऊन त्या पुढे न्यायदान करीत असत. अहिल्यादेवी यांची न्यायदान प्रक्रिया प्रसिद्ध व जनप्रिय होती.
श्री गोदावरी नदी पात्रात रामकुंडाच्या पुढे कुंड बांधायला अहिल्याबाई होळकर यांना सन १७६६ ते १७९५ पर्यंतचा कालावधी लागला. त्याकाळी गोदेचा प्रवाह किती विराट होता हे लक्षात येते. त्यामुळेच कुंड निर्मितीला तब्बल २९ वर्षे लागली. सदरहू बुजवलेल्या कुंडाला सिमेंट काँक्रिटचा पाशातून मुक्त हवी आहे.
वरील फोटोत आपण बघू शकता की, अहिल्यादेवी पटांगणावर कोर्ट भरत असे. कोर्टातील जागा दुतोंडया मारुती समोर, गोदा घाट.
Ahilyadevi Court in Nashik 17th Centaury Nostalgia by Devang Jani
History