अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातील महापालिका हद्दीत नियमित साफसफाई होत नाही, गटारी साफ सफाई होत नाही, रस्त्यांवर चिखलांचे साम्राज्य त्यामुळे डबक्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे शहरात डासांच प्रमाण वाढल्याने औषध फवारणी करावी यासह विविध मागण्यांसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तर्फे महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी आंदोलन स्थळी भेट देऊन संघर्ष समितीचे निवेदन स्विकारत योग्य ती कारवाई करण्याच आश्वासन दिले. दरम्यान उद्या मुख्यमंत्र्यांना शहरातील विविध प्रश्नावर निवेदन देण्यासाठी समितीने त्यांच्याकडे परवाणगी मागितली आहे.
–








