India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकमध्ये शरद पवार यांनी शिंदे सरकार केली ही टीका

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही. पण, निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की एक महिना झाला राज्याला मंत्री नाहीत. मंत्रीमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते लोक संकटात आहे, तिकडे भेटी देताय यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा असा चिमटाही त्यांनी काढला. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधात भास तुम्हीच बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा दौ-यावर पवार आले असता त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी पवार यांनी न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक असल्याचेही सांगितले. या निर्णयामुळे मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी सांगितले की, जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले, टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या आघाडीबाबत बोलतांना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू आगोदर ओबीसी बाबत निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी अशी तरी सद्या आमची भूमिका आहे. यावेळी त्यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीच्या हालचालीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत निर्णय घेतल्यावर बघू.


Previous Post

अक्षरबंधच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा; महाडिकसह यांना मिळाला पुरस्कार

Next Post

आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन ( व्हिडीओ )

Next Post

आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन ( व्हिडीओ )

ताज्या बातम्या

नाचणी कुकीज, लाडू, बाजरी चिवडा, नाचणी सत्व या पदार्थांना मोठी मागणी; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

February 3, 2023

भाजपची निवडणूक तयारी सुरू; राज्यभरात प्रवक्त्यांची अशी आहे तगडी फौज (बघा संपूर्ण यादी)

February 3, 2023

राज्यातील सर्व बाल सुधारगृहात सुरू होणार हे केंद्र; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – संकटांपासून हे तुमचे रक्षण करतात

February 3, 2023

सिन्नर – पुणे महामार्गावर ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाचा खून

February 2, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज आर्थिक समस्यांमधून मार्ग मिळेल; जाणून घ्या, शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group