बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा या दिवशी राज्यव्यापी लाक्षणिक संप…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 19, 2024 | 3:49 pm
in स्थानिक बातम्या
0
Anganwadi Karmachari Sevika


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर्फे २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप करून अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.

या संपाविषयी कृती समितीने सांगितले की, गेल्या दीड, दोन वर्षांपासून सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी सतत लढत आहेत. काय मागतायत त्या तर जगण्याइतके मानधन, महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता, ग्रॅच्युइटीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी, संपूर्ण आयुष्य योजना राबविण्यासाठी दिल्यानंतर म्हातारपणाची सोय म्हणून मासिक पेन्शन….० ते ६ वयोगटाची बालके आणि त्यांच्या माता यांची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी झिजणाऱ्या या कष्टकरी महिलांच्या मागण्या रास्त नाहीत काय?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कृती समिती या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण महायुती सरकारच्या दगडी हृदयाला काही पाझर फुटत नाही! त्यांना त्यांचा हक्क द्यायचा सोडून हे सरकार सर्व कल्याणकारी योजनांचा निधी पळवून लाडक्या बहिणींच्या झोळीत घालत आहे. आणि त्यासाठी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच वेठीला धरत आहे. सरकारची कोणतीही योजना येवो, आपले दैनंदिन कामकाज करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्या योजना यशस्वी करण्यासाठी मर मर राबावे लागते. पण बदल्यात त्यांना काय मिळते? किमान वेतनाच्या पासंगालाही पुरणार नाही असे अल्प मानधन. म्हातारपणी वर्षभर सुद्धा न पुरणारा एकरकमी सेवा समाप्ती लाभ…. बस्स, इतकेच!

महागाई भत्त्याला जोडलेले किमान वेतनाइतके मानधन, ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन, आहार व इंधनाच्या दरात वाढ, मदतनिसांची सेविका पदी व सेविकांची पर्यवेक्षिका पदी बढती यांचे अन्यायकारक निकष बदलणे, मिनी अंगणवाड्यांचे मुख्य अंगणवाडीत रुपांतर, अंगणवाडीच्या भाड्यात वाढ या महत्वाच्या व मूलभूत मागण्यांसाठी त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये संप केला परंतु १५०० व १००० रुपयांची मानधन वाढ वगळता पोकळ आश्वासनांखेरीज काहीच पदरात पडले नाही. आश्वासनांची पूर्तता व भरीव मानधन वाढ या मागण्यांसाठी पुन्हा ४ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रदीर्घ संप करावा लागला. आशांइतकी मानधन वाढ, ग्रॅच्युईटी, पेन्शन याची आश्वासने मिळाल्यामुळे वाटाघाटी होऊन संप मागे घेण्यात आला. परंतु मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर वगळता अजूनही या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. आता त्यांची सहनशक्ती संपली आहे. या सरकारचे थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. आता एक शेवटचा दणका देण्यासाठी त्या लाक्षणिक संप करून, अंगणवाड्या बंद करून २१ ऑगस्टला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धाव घेत आहेत. आता तरी शासन आपल्या या वेठबिगार, लाडक्या नसलेल्या बहि‍णींचा आवाज ऐकणार काय ? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी केला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक…एटीएसची मोठी कारवाई

Next Post

ताई तू कधी कमिशनकन्या झालीस…रक्षाबंधनानिमित्त देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांना भावाने पाठवलेले खरमरीत पत्र चांगलेच व्हायरल…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20240819 WA0260 e1724063468930

ताई तू कधी कमिशनकन्या झालीस…रक्षाबंधनानिमित्त देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांना भावाने पाठवलेले खरमरीत पत्र चांगलेच व्हायरल…

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011