India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वेदांता फॉक्सकॉननंतर आता ‘फोन पे’ देखील महाराष्ट्रातून जाणार; सर्वच स्तरातून टीका

India Darpan by India Darpan
September 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची चर्चा असताना हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला यावरून राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक बातमी समोर येत आहे. फोनपे या मोठ्या कंपनीनेदेखील महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फोनपेने आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं एका जाहिरातीद्वारे दिली आहे.

एका वृत्तपत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये फोनपेने आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. फोन पेच्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच वेदांता-फॉक्सकॉननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु यापूर्वी तो महाराष्ट्रात येणार असल्याचे म्हणले जात होते. दरम्यान, या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. परंतु कंपनीने गुजरातची निवड केली आणि महाराष्ट्राच्या पदरी निराशा पडली.

फोनपेच्या जाहीरातीमध्ये काय?
“कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयल महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा २०१२च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे,” असं कंपनीने दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

#PhonePe Debited from Maharastra, credited to Karnataka.

वेदांतानंतर #PhonePe ची बारी
गब्बर होतायेत शेजारी
महाराष्ट्र पडतोय आजारी
व्वा रे 🤔 सत्ताधारी!!!

टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY
महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! pic.twitter.com/RTrgLzCOTj

— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2022

After Vedanta Phonepay Will Also Leave Maharashtra
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

छप्पर फाडके ऑफर! आयफोन चक्क १८ हजार रुपयांमध्ये! कुठे? वाचा सविस्तर….

Next Post

आमिर खानच्या मुलीला याने केले प्रपोज, चुंबनही घेतले (व्हिडिओ व्हायरल)

Next Post

आमिर खानच्या मुलीला याने केले प्रपोज, चुंबनही घेतले (व्हिडिओ व्हायरल)

ताज्या बातम्या

सिन्नर – पुणे महामार्गावरील युवकाच्या खूनाचा उलगडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

February 3, 2023

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group