मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची चर्चा असताना हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला यावरून राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक बातमी समोर येत आहे. फोनपे या मोठ्या कंपनीनेदेखील महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फोनपेने आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं एका जाहिरातीद्वारे दिली आहे.
एका वृत्तपत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये फोनपेने आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. फोन पेच्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच वेदांता-फॉक्सकॉननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु यापूर्वी तो महाराष्ट्रात येणार असल्याचे म्हणले जात होते. दरम्यान, या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. परंतु कंपनीने गुजरातची निवड केली आणि महाराष्ट्राच्या पदरी निराशा पडली.
फोनपेच्या जाहीरातीमध्ये काय?
“कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयल महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा २०१२च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे,” असं कंपनीने दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1572918859400507392?s=20&t=g94I8K3LhoPVOiUmLqYZFw
After Vedanta Phonepay Will Also Leave Maharashtra
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/