सोमवार, नोव्हेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१० वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केलेला पती जेव्हा घरी परतला….

ऑगस्ट 12, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही, प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगातून जायचे आहे, म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. अनेक जण वयोमानाप्रमाणे वृद्ध होतात आणि त्यांचे निधन होते, तर काहीजण  मोठे आजारपण, अपघात किंवा अन्य कारणाने मृत्यू पावतात, मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे परिवाराला दुःख होतेच, काही दिवस दुःख करण्यात येते. त्यानंतर जो तो आपापल्या दैनंदिन कामाला लागतो. परंतु मृत्यू पावलेला तोच व्यक्ती जर पुन्हा काही दिवसांनी घरी आला तर नक्कीच कुणालाही आश्चर्य वाटेल, असाच एक प्रकार आता घडला आहे.

असे काही वेळा घडते की एखाद्या व्यक्ती अपघातात मरण पावला किंवा कुठेतरी त्याची दुर्घटना घडली आणि मृत्यू पावल्याचे समजते. वास्तविक व्यक्ती मरण पावलेलाच नसतो घरच्या किंवा कुटुंबाला मात्र तो व्यक्ती मरण पावल्याचे समजतात, मात्र काही दिवसांनी तो येतो अशा काही तुरळ घटना आपल्या देशात काही राज्यात घडलेल्या आढळून येतात ,बिहारमध्ये देखील नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे.

बक्सर जिल्ह्यातील कोरानसराय गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ती व्यक्ती तब्बल ३० वर्षांनी आपल्या गावी परतला. त्याला पाहून कुटुंबीयांना विश्वासच बसला नाही. शेवटी पत्नीने तीळ पाहून त्याची ओळख पटवली. ही घटना  आहे. गावातील घनश्याम तेली ३० वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो बक्सरच्या बस स्टँडवरुन बेपत्ता झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यावर कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला होता, मात्र तो सापडला नाही. शेवटी त्याला मृत समजून कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. बेपत्ता झालेला तरुण अचानक गावी परतल्याने गावकरीही हैराण झाले आहेत. मात्र घनश्याम यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते काहीच बोलू शकत नाहीत. त्यांचं वयही 55 हून जास्त झाली आहे.

मात्र घनश्याम परतल्यामुळे त्यांची पत्नी मुन्नी देवी खूप आनंदात आहे. गावकऱ्यांनी घनश्याम तेली आणि मुन्नी देवी यांचं पुन्हा लग्न लावून दिलं. धुमधडाक्यात दोघांचं लग्न करण्यात आलं. जेवणदेखील ठेवण्यात आलं. मुन्नी देवीने सांगितलं की, ३० वर्षांपूर्वी पती बेपत्ता झाला होता. त्यावेळी त्यांना एक मुलगाही होता. तर त्यावेळी मुन्नी देवी गर्भवती होती. १० वर्षांपूर्वी तिच्या सासऱ्याच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू झाल्याचं समजून दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्यात आलं होते.

एक दिवस पोलीस ठाण्यातून अचानक फोन आला की, तिचे पती सापडले. हे ऐकून सुरुवातीला तर तिला धक्काच बसला. यानंतर मुलगा आणि जावयाला घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. येथे पतीच्या डाव्या मांडीवरील तिळावरुन पतीची ओळख पटवली. मुलगा आणि जावयाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पतीची ओळख पटवली.

मुन्नी देवीने दिलेल्या माहितीनुसार, पती बेपत्ता झाल्यानंतर त्याला खूप शोधण्यात आलं. यानंतर सासरची मंडळी आणि गावातील काही लोक तिच्यावरच हत्येचा आरोप लावत होते. पती जेव्हा बेपत्ता झाले तेव्हा त्या २५ वर्षांच्या होत्या. त्यांना दोन मुलंही होते. वडिलांनी तिला दुसरं लग्न करण्यास सांगितलं, मात्र तिने ऐकलं नाही. आता पती अचानक आल्याने तिला खूप आनंदा झाला आहे. इतकेच नव्हे तर गावातील नागरिकही आनंदी आहेत.

After Cremation of 10 Years Husband Came Back at Home
Buxar Bihar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नात वऱ्हाडी म्हणून जायचे आणि हा उद्योग करायचे; पोलिसांनी पकडली मोठी टोळी

Next Post

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये प्रथमच हे घडले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
17 e1660235665379

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये प्रथमच हे घडले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011