गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नोकरी लागल्यानंतर अवघ्या २ महिन्यातच त्याने लांबवली तब्बल पावणे तीन कोटींची कॅश

by India Darpan
सप्टेंबर 10, 2022 | 7:15 pm
in राज्य
0
crime 123

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एटीएम मशीन २४ तास आणि ७ दिवस सतत बँकेच्या ग्राहकांना वापरणे शक्य होते. ही कॅश आणणारे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक निश्चितच विश्वासू असतात, परंतु त्यांनीच विश्वासघात केला तर? अशीच एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे घेऊन कॅश व्हॅनचा चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना गोरेगावमध्ये घडली होती. या आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. एटीएम मशिनमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या या कॅश व्हॅनमध्ये २ कोटी ८० लाख रूपये होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कॅश घेऊन आलेला चालक व्हॅनसह हे पैसे घेऊन फरार झाला होता. वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ही व्हॅन निघाली होती. संधी मिळताच चालक ही व्हॅन घेऊन फरार झाला होता. चालक त्या व्हॅनसह पळून गेला त्यावेळी त्या व्हॅनमध्ये एकूण २ कोटी ८० लाख रुपये होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर गोरेगाव पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली.

कॅश व्हॅन वेगवेगळ्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅश घेऊन आली होती. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान तो कंपनीतील त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन निघाला. गोरेगाव पश्चिमेकडे असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कॅश व्हॅन बँकेजवळ थांबल्यावर उदयभानचे सहकारी रोकड भरण्यासाठी खाली उतरले. ते काम आटपून परतले. त्यांनी इकडे तिकडे पाहीले तरतेव्हा उदयभान तिथे नव्हता. उदयभान व्हॅन घेऊन तिथून गेला होता. त्यांनी उदयभानला वारंवार फोन केले. मात्र त्यानं प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी जीपीएसच्या माध्यमातून उदयभानचं लोकेशन शोधले.

पोलिसांनी कॅश व्हॅनमध्ये बसवलेल्या जीपीएसच्या मदतीने वाहनाचे लोकेशन ट्रेस केले असता कॅश व्हॅन गोरेगावच्या पिरामल नगरमध्ये उभी असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले. त्यावेळी तिथं वाहन मिळून आलं मात्र चालक तिथं नव्हता, तसेच पैसे देखील गायब होते. यानंतर पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला.  या प्रकरणाच्या तपासात आरोपी चालक उदयभान सिंह (वय ३४) याला पालघर येथून अटक केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी फक्त गेल्या दोन महिन्यांपासून कॅश मॅनेजमेंट एजन्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आणि दोन महिन्यातच त्यांनी हा असा कारभार केल्याने तो जणू काही पैसे लंपास करण्यासाठी चालला होता की काय अशी चर्चा आता सुरू आहे.

After 2 Months Job 2 Crore 80 Lakh Cash Theft
Crime Mumbai Theft ATM Van

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कतरिनाचे प्रसिद्ध ‘काला चष्मा’ गाणे कुणी लिहिलंय माहितीय का? मानधनापोटी त्याला मिळाले एवढे रुपये

Next Post

बाप रे! सलूनमध्ये अचानक झाला हेअर ड्रायरचा स्फोट (बघा, थरारक व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 29

बाप रे! सलूनमध्ये अचानक झाला हेअर ड्रायरचा स्फोट (बघा, थरारक व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011