सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गायक आणि ‘सारेगम’ होस्ट आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. श्वेता गरोदर असून त्यांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. लवकरच बाबा होणार असल्याचे आदित्यने सोशल मीडियावर जाहीर केले आबे. आदित्य आणि श्वेता यांनी त्यांच्या बेबी शॉवरचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आदित्य आणि श्वेताने त्यांच्या बेबी शॉवरमधील तीन फोटो शेअर केले आहेत. हे जोडपे पांढरे कपडे घातलेले दिसत अशून श्वेता एका सोफ्यावर बसलेली आहे. आदित्य तिच्या मागे उभा आहे. तिसऱ्या चित्रात आदित्य श्वेताच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. या जोडप्याने फक्त “#BabyShower” असे या पोस्टला कॅप्शन दिले. त्यानंतर लाल हृदय आणि हात जोडलेले इमोजी दिले आहे. या गोड बातमीबद्दल त्यांना चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून अभिनंदनाचे संदेश आले.
गायिका श्वेता पंडित ही सर्वप्रथम कमेंट करणाऱ्यांपैकी एक होती. “मैं बुआ बनूंगी” असे तिने लिहिले आहे. विविध सेलिब्रिटींनी आदित्यचे अभिनंदन केले आहे. इंडियन आयडॉलच्या जज नेहा कक्करने लिहिले, “व्वा.. किती सुंदर!! तुम्हा दोघांचे अभिनंदन.” तर गायिका श्रेया घोषालने कमेंट केली आहे की “व्वा!! मनःपूर्वक अभिनंदन किती छान बातमी आहे”. नीती मोहन, सलीम मर्चंट, मृणाल ठाकूर, अविका गोर, सृष्टी श्रेष्ठ, आदिती सिंग शर्मा, सुगंधा मिश्रा आणि अर्जुन बिजलानी आदींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
श्वेताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर बेबी शॉवरचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहे. ‘बेबी ऑन द वे’ असे कॅप्शन असलेली पोस्ट रिशेअर करून, तिने पांढऱ्या फुलांची थीम असलेला केक कापतांनाची झलक दाखवली आहे. या जोडप्याने जाहीर केले होते की ते आई-बाबा होणार आहेत. “आम्ही आमच्या पहिल्या बाळाचे लवकरच स्वागत करत आहोत, हे सांगताना श्वेता आणि मला कृतज्ञ आणि धन्य वाटत आहे. #BabyOnTheWay”. आदित्यने इन्स्टाग्रामवर स्वतःचा आणि श्वेताचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CZJsOFLvQck/?utm_source=ig_web_copy_link
आदित्य नारायण लहान पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण म्हणाला, ‘आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी श्वेता आणि मी आनंदी आहोत. मला नेहमीच लहान मुले आवडतात. श्वेताला आता जास्त काम असेल, कारण मी पण लहान मुलापेक्षा कमी नाही. आम्ही नुकताच एक खोडकर गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा देखील दत्तक घेतला आहे.” त्याच मुलाखतीत आदित्यने शेअर केले की त्यांना आशा आहे की, त्यांच्या घरी मुलगी येईल. “मला मुलगी झालेली आवडेल कारण वडील त्यांच्या मुलींच्या सर्वात जवळ असतात,” तो म्हणतो. त्याचे आई-वडील देखील कुटुंबात नवीन मेंबरच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. “माझे वडील आणि आई दोघेही लवकरच आजी-आजोबा होतील याबद्दल उत्सुक आहेत, परंतु माझे वडील (गायक उदित नारायण ) स्वतःला व्यक्त करताना माझ्यासारखा थोडे लाजाळू आहेत,”असे आदित्यानी सांगितले. आदित्य आणि श्वेता यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न सोहळा केला होता. लग्नाच्या आधी ते बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर नाशिकच्या सुला विनयार्डसमध्ये ते हनीमूनसाठी आले होते.