नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे नाशिक जिल्हा अधिवेशन १५ एप्रिल रोजी १२ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, टिळक पथ शालिमार नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनास राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, नाशिक जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,आयटक नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. व्ही डी धनवटे ग्राम पंचायत कर्मचारी नेते सखाराम दूर्गडे, कामगार नेते कॉ. महादेव खुडे, कॉ. तल्हा शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात आशा गट प्रवर्तक लढा, पुढील दिशा, राज्य अधिवेशन गोंदिया २७, २८ एप्रिल माहिती, जिल्ह्याचे नवीन पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. तरी नाशिक जिल्हा आशा गट प्रवर्तकनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अर्चना गडाख, सुरेखा खैरनार, सुवर्णा मेतकर, सुमन बागुल, लता सहाने, ज्योती खरे, सुनीता कुलकर्णी, सुनीता गांगुर्डे ,कांचन पवार, समीरा शेख, रत्ना म्हसदे, प्राजक्ता कापडणे, जयश्री गोलनिस, नमिता गोंढणे, ज्योती अहिरे, फरहा शेख आदींनी केले आहे.