मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी समुहामुळे सध्या शेअर बाजारासह आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठ्या वादात रिझव्र्ह बँकेची एण्ट्री झाली आहे. यासंदर्भात आता रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना आदेश काढले आहेत. अदानी समुहाशी संबंधित सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.
सरकारी आणि बँकिंग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहामध्ये करण्यात आलेली गुंतवणूक आणि या समुहाला दिलेल्या कर्जाविषयी माहिती देण्यास आरबीआयने विविध देशांतर्गत बँकांना सांगितले आहे. सध्या जारी करण्यात आलेल्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या चढ-उतारानंतर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. अदानी समूहाने आपला एफपीओ काढून घेतला आहे. आज, गुरुवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
अदानी समभागात विविध बँकांकडून दिलेली कर्जे आणि गुंतवणुकीची माहिती आरबीआय घेणार आहे. त्यातच अदानींच्या शेअर्समध्ये नवीन चढ-उतार होत असताना बँकांची आर्थिक स्थिती चांगली राहावी अशी खात्री रिझर्व्ह बँक करू इच्छित आहे. अदानी समूहाबाबत हिंडनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Adani Group RBI Entry Bank Order Investment Loan