India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाश्यांचा हल्ला; नेमकं काय घडलं?

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेते सयाजी शिंदे यांचे पर्यावरण प्रेम हे सर्वांना माहीत आहे. पर्यावरणाचे रक्षण करत असतानाच सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला झाल्याची घटना घडली. पुणे – बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही तसेच मी सुखरूप असल्याचे सयाजी शिंदे यांनी व्हिडीओवरून सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतची झाडे तोडली जात आहेत. याच झाडांचे पुनर्रोपण शिंदे हे करीत आहेत. तेथील झाडे वाचवण्यासाठी सयाजी शिंदे हे तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी अचानक एका झाडावरील मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. तेथे सयाजी शिंदे देखील उपस्थित होते. शिंदे आणि इतर सर्वांनी माशांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ करून आपल्याला मानेला आणि कानाजवळ माश्या चावल्या मात्र मोठी दुखापत झालेली नाही. तसेच आपण सुखरूप असल्याचे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. पर्यावरणासाठी सुरू असलेले काम असेच सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे त्यांच्या ‘सह्याद्री देवराई’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड करत असतात. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती. राज्यभरातील खूप जुन्या झाडांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले. त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला!; नेमकं काय घडलं? #SayajiShinde #MarathiActor #News #MahaMTB #Environment pic.twitter.com/esIemqPYj0

— महा MTB (@TheMahaMTB) March 14, 2023

काही दिवसांपूर्वी असाच प्रकार
काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील दुसरबिड इथे लग्न वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केला होता. १ मार्च रोजी सायंकाळी लग्न समारंभाच्या वेळी नवरदेव घोड्यावरुन लग्नस्थळी जात असताना डीजेच्या आवाजामुळे झाडावरील मधमाशांनी या लग्नातील वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला केला. यानंतर घोड्यासह नवरदेव धावत सुटला तर वऱ्हाड मंडळी, बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग करणारा फोटोग्राफरसह सर्वच जण आपला जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत सुटले. यावेळी जवळपास २५० वऱ्हाड्यांना मधमाशांनी चावा घेतला तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सर्व वऱ्हाडी मंडळींवर उपचार करण्यात आले.

सयाजी शिंदे हे ‘घर, बंदूक, बिर्याणी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात त्यांच्यासोबत नागराज मंजुळे, आकाश ठोसर हे देखील या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. सयाजी शिंदे यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Actror Sayaji Shinde Honeybee Attack


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हेच देवाला आवडेल

Next Post

बँड, बाजा, बाराती सब रेडी लेकिन शादी नही हुई…. असं का? अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहादचा निर्णय..

Next Post

बँड, बाजा, बाराती सब रेडी लेकिन शादी नही हुई.... असं का? अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहादचा निर्णय..

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group