इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात कधी काय होईल याचा काहीच नेम नाही. असाच काहीसा प्रकार एका लग्नाबाबत घडला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. नंतर १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी व्हिडीओ शेअर करत लग्नाची माहिती दिल. त्याच दिवशी दोघांचा साखरपुडा देखील पार पडला. त्यानंतर दोन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. तिने हळदीचे व संगीतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. पण, आश्चर्य म्हणजे, लग्नाची तयारी झाली असली तरी त्यांचं लग्न झालं नाही आणि होणारही नाही अशी माहिती समोर आली आहे.
आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलासोबत लग्न करत असल्याने तसेच नवरदेव धर्मातील नसल्याने स्वरा भास्कर या कोर्ट मॅरेजनंतर चांगलीच ट्रोल झाली होती. त्यानंतर आता तिच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याने आणि त्याची तारीख आधीच जाहीर झाल्याने सगळ्यांनाच तिच्या लग्नाची उत्सुकता होती. मात्र, सगळी तयारी करूनही लग्न झालेच नसल्याचे समोर आले.
अभिनेत्री स्वराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा ब्रायडल लूक शेअर केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मेहरून आणि गोल्डन कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. याला साजेसे दागिने तिने कॅरी केले आहेत. हातला मेहेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथापट्टी आणि केसांत गजरा अशा तेलुगू नवरीच्या लूकमध्ये स्वरा सुरेख दिसते आहे.
स्वराने लग्नाच्या विधीचे फोटो टाकलेले नाहीत, त्यामुळे स्वरा व फहादने हिंदू किंवा मुस्लीम कोणत्याही पद्धतीने लग्न केलेलं नाही, अशा चर्चा आहेत. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, “स्वरा आणि फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे फंक्शन्स आयोजित केले होते. मात्र त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही.”
फहाद आणि स्वराने कोर्ट मॅरेज केल्याने दोघेही कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्नगाठ बांधणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांच्या संगीत व ब्रायडल लूकचे फोटो समोर आले आहेत. पण, त्यांनी लग्न केलेलं नाही. तर, त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन १६ मार्च रोजी दिल्लीत होणार आहे, असं म्हटलं जात आहे.
https://twitter.com/ReallySwara/status/1635581938562899975?s=20
Actress Swara Bhaskar and Fahad Ahmad Wedding Ceremony