इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याची, तसेच आपल्या आयुष्यातील अनेक घटना जगासोबत शेअर करण्याचा सेलिब्रिटींचा प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मिडीया. आणि सेलिब्रिटीज त्याचा पुरेपूर वापर करून घेतात. याच्या माध्यमातून सातत्याने आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. चाहत्यांना अपडेट्सही देत असतात. मात्र, यातीलच एखादं अकाऊंट अचानक बंद झालं तर सेलिब्रिटीजसह त्यांचे चाहते देखील अपसेट होतात. सध्या असाच काहीसा अनुभव अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांना येत आहे.
सनीचं लिंक्डइन अकाउंट ब्लॉक झाल्याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावरून दिली. अकाउंट ब्लॉक करण्यामागचं लिंक्डइनने दिलेलं कारण ऐकून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. परंतु काहीही असलं तरी आता ‘लिंक्डइन’ने तिचं अकाउंट थेट ब्लॉक केलं.
फेसबुक, इंस्टाग्राम याप्रमाणेच सनी लिंक्डइनवरही खूप सक्रिय असते. तिचं प्रोफाइल ती नेहमीच अपडेट ठेवते. इतर सोशल मीडिया साइट्सप्रमाणे लिंक्डइनवरतीही सनीचे भरपूर फॉलोवर्स आहेत. पण आता अचानक तिचं अकाउंट ब्लॉक झाल्याने सर्वजण अवाक झाले. हे अकाउंट ब्लॉक करण्यामागे लिंक्डइनने दिलेलं कारण ऐकून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सनीने स्वतः सोशल मीडियावरून दिली. तिने तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात ती म्हणते की, “लिंक्डइनवर काही महिने खूप छान वेळ घालवल्यानंतर आता त्यांनी माझं अकाउंट ब्लॉक केलं आहे. त्यांना वाटलं की मी खरी सनी लिओनी नाही, पण ती मीच होते.” सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आता या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हे खूप चुकीचं आहे. अकाउंट ब्लॉक करण्यापूर्वी त्यांनी एकदा तपासून पाहायला हवं होतं.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “बरं झालं तुम्ही हे सांगितलं. नाहीतर यबद्दल कोणालाही कळलं नसतं.” सनीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
https://twitter.com/SunnyLeone/status/1630457434878906370?s=20
Actress Sunny Leone LinkedIn Account Block