इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करत आहेत. घरांमध्ये रोज पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमधील कलाकार रोज प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. या मालिकांमध्ये झळकणारी श्रद्धा आर्या ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री. श्रद्धा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या श्रद्धाने शेअर केलेल्या आपल्या लग्नाच्या पोस्टवरून चर्चांना उधाण आले आहे.
श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे श्रद्धा आर्या पुन्हा विवाहबंधानात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शननेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रद्धा आर्या सध्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते आहे. खरंतर या मालिकेत ती विवाहबंधनात अडकली आहे. तेव्हा श्रद्धा खऱ्या आयुष्यात नव्हे तर मालिकेत विवाहबंधनात अडकली आहे. श्रद्धाने शेअर केलेले फोटो हे मालिकेच्या सेटवरील आहेत. आणि तेही एकदा नव्हे तर तब्बल १० वेळा तिने मालिकेत लग्नगाठ बांधल्याचं श्रद्धाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “जेव्हा एकाच मालिकेत तुम्ही १० वेळा विवाहबंधनात अडकता..तेव्हा का, कधी आणि कोणाबरोबर याची पर्वा तुम्ही करत नाही”, अशी मजेशीर कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, श्रद्धा आर्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी तिने खऱ्या आयुष्यात राहुल नागलसह लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धाचे पती नौदल अधिकारी आहेत. २०२१ मध्ये श्रद्धाने विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.
Actress Shraddha Arya Wedding Photos Viral