इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साऊथचे सुपरस्टार अभिनेते अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा – द राइज’ हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. आगामी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर अजून रिलीज व्हायचा आहे, मात्र याच दरम्यान चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने एक मजेशीर खुलासा केला आहे.
गुडबाय चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रश्मिका मंदाना म्हणाली की, ‘मी माझे स्वप्न जगत आहे, अल्लू अर्जुन सरांसोबत मी काही दिवसांत पुष्पा २ वर काम सुरू करणार आहे. पण सध्या मी अमिताभ बच्चन सरांसोबत केलेल्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करत आहे. याबद्दल मी आणखी काय सांगू. रश्मिकाचे पुष्पामधील काम प्रेक्षकांना खूप आवडले होते.
रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ मधून अचानक उत्तर भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. गुडबाय चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तुम्हाला सांगतो की पुष्पा-१ ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले होते आणि आता कथा अपूर्ण राहिल्याने प्रेक्षक दुसऱ्या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
Actress Rashmika Mandana on Pushpa 2 Movie