इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री राखी सावंत आणि वाद यांचे नाते जुनेच आहे. काही ना काही करून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचे काम राखी नेहमीच करताना दिसते. सध्या देखील ती चर्चेत आहे. आता चर्चेत असण्याचे कारण म्हणजे राखीने पती आदिलवर केलेले आरोप. आता राखीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यातील वाद बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राखीने आदिलवर फसवणूक तसेच मारहाणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. याचबरोबर आदिलचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर असून तिच्याशी आदिलने लग्न केल्याचंही राखीचं म्हणणं आहे. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारीला अटक केली. तरीही राखीचे समाधान झाले नसून अजूनही त्यांच्यातील वाद धुमसताच आहे.
आदिल तुरुंगात असताना राखी त्याच्यावर सातत्याने आरोप करत आहे. राखीचे नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आताही तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्यावर रडताना दिसत आहे. राखीला पाहताच पापाराझी छायाचित्रकारांनी तिला पकडले. रडत रडत ती त्या पत्रकारांना सांगते की, “त्या मुलीचे ऑडिओ आणि व्हिडीओ आज आले आहेत. माझं घर तोडलं. राखी सावंतला रस्त्यावर आणलं. माझ्यासारख्या खंबीर मुलीला हा कसा फसवू शकतो. माझं आयुष्य का उद्धवस्त केलं? देवा माझ्यावर थोडी तरी दया कर,” असे राखी या व्हिडीओत सांगते आहे.
राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आदिल खानला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवार, २० फेब्रुवारीला आदिलची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reel/Co7H7v1jtOJ/?utm_source=ig_embed&ig_rid=b46fa881-8399-45f7-9aec-8f688766d1b5
Actress Rakhi Sawant Crying on Road Video Viral