मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रोजच चर्चेत असते. या अभिनेत्रीबाबत रोज काही ना काही बातम्या समोर येत असतात. आणि आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार राखीला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने या बातमीला दुजोरा देत ट्विट केले की, ‘अंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. राखी सावंतचा जामीन अर्ज ABA 1870/2022 काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.
अभिनेत्री राखी सावंत ही आज दुपारी 3 वाजता तिची डान्स अकादमी लॉन्च करणार होती, जिथे तिने तिचा पती आदिल खान दुर्रानीसोबत भागीदारी केली आहे. गेल्या वर्षी शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक युद्ध झाले होते. अशा परिस्थितीत शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शर्लिन चोप्राने आरोप केला आहे की, राखीने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. गेल्या वर्षी राखीने पोलिसांना सांगितले की, शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि अपशब्द वापरले होते.
https://twitter.com/SherlynChopra/status/1615978337184415744?s=20&t=gYbIrtUHkKIZlqR9-C_xCA
Actress Rakhi Sawant Arrested by Mumbai Police